10 आरोपींविरुद्ध गुन्हा; सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांची मोठी कारवाई

बीड | वार्ताहर

तालुक्यातील महाजनवाडी शिवारात शेतातील चंदनाची झाडे तोडून नंतर त्यातील गाभा काढून त्याची चोरटी विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला 23 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह त्यांच्या पथकातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली.या कारवाईत 499 किलो चंदनाची तासलेला गाभा,लाकडे वजन काटा वाकस  व कुऱ्हाडी व बोलेरो पिकअप  असा एकूण 20 लाख 72 हजार 700 रुपयाचा माल जप्त करून एकूण 10  आरोपी विरुद्ध नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने चंदन चोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

 

महाजनवडी (ता.बीड)  येथील एक व्यक्ती  स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरित्या काही इसमाच्या मदतीने शिवारातील शेतात चंदनाची झाडे चोरून तोडून आणलेल्या झाडांची खोडे तासून त्यातील गाभा चोरटी विक्री करण्यासाठी घरात आणून ठेवला आहे, अशी माहिती सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी खातरजमा करत सदरची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना कळवली. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत व त्याच्या पथकातील पोलीस  पथकातील पोलिस अंमलदार यांनी सदरील ठिकाणी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास छापा मारला. या ठिकाणी चंदनाची खोडे तासीत असणारा एक इसम जागीच मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन नाव गाव विचारले असता  एक अशोक रामहारी घरत (रा.महाजनवाडी) असे सांगितले. त्याच्या घराची झडती घेतली असता घरात 499 किलो चंदनाची तासलेला गाभा,लाकडे वजन काटा वाकस  व कुऱ्हाडी व बोलेरो पिकअप  असा एकूण 20 लाख 72 हजार 700 रुपयाचा माल जप्त केला. या कारवाईत एकूण 10  आरोपी विरुद्ध नेकनूर ठाण्यात हवालदार बालाजी शेषेराव दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक  नंदकुमार ठाकुर, बीड अपर पोलीस अधीक्षक कविटा नेरकर ,यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक शपंकज कुमावत, पोलिस कर्मचारी  बाबासाहेब बांगर ,बालाजी दराडे,अमजद सय्यद ,राजू वंजारे ,रामहरी भांडाने, संजय टूले ,शिवाजी कागदे दीपक जावळे मपोना आशा चोरे यांनी केली.

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.