परभणी जिल्ह्यातील चौघांविरुध्द गेवराई ठाण्यात गुन्हा
गेवराई । वार्ताहर
तक्रार मागे घेण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देत एका 19 वर्षीय तरुणाला बळजबरीने पळवून नेत डांबून ठेवले गेले. या प्रकरणी परजिल्ह्यातील 4 जणांविरुध्द 22 जुलै रोजी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलीसांनी सांगीतले,कृष्णा दिपक शिंदे (रा.शिवाजीनगर,गेवराई) असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सुनील समशेर भोसले, पप्या उर्फ रवी आवडेल शिंदे, आवडेल आपरंग शिंदे (तिघे रा.डोबारी तांडा,ता.सोनपेठ,जि.परभणी) व छगण शिंदे (रा.भिमसेगाव,ता.सोनपेठ) यांनी संगणमत करत 11 जुलै ते 22 जुलै 2022 दरम्यान बळजबरीने डोबारी तांडा येथे पळवून नेले. तिथे त्यास ‘तू आमच्याविरुध्द दाखल केलेली खूनाची तक्रार मागे घे’ अन्यथा तुझे तुकडे करुन मारुन टाकू, तुला सोडणार नाही’ अशी धमकी दिली. त्यावरुन चौघांविरुध्द गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोह.डोंगरे पुढील तपास करत आहेत.
Leave a comment