पंकजाताई मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार
मुंबई । वार्ताहर
राज्यातील नगरपरिषदांचे नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सरपंच आता थेट जनतेतून निवडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले आहे. हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.
थेट जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवडीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द केला होता. आता नव्याने सत्तारूढ झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने हा निर्णय पुन्हा घेतला आहे. सरकारच्या या जनहिताच्या निर्णयाचे पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले आहे. "डायरेक्ट लोकांतून सरपंच व नगराध्यक्षाची निवडणूक होणार.. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे आणि पूर्वी मी ग्रामविकास मंत्री असताना लोकप्रिय असा हा निर्णय होता" असं ट्विट करत पंकजाताईंनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
Leave a comment