भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी

 
मुंबई | वार्ताहर 
 

राज्यात 18 ऑगस्ट रोजी नगरपालिका निवडणूकासाठी मतदान होत असून या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षण  देऊनच निवडणूका

होतील, अशी खंबीर पावलं उचलावीत अशी मागणी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पंकजा मुंडे यांचं ट्विट

शुक्रवारी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर ओबीसींच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शनिवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हे यासंबंधीचं ट्विट केलंय. त्यात त्या म्हणाल्या, काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत… नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील अशी खंबीर पावलं उचलावी .. सरकार कडून न्याय मिळेल हा विश्वास आहे…

 

शुक्रवारी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर ओबीसींच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शनिवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हे

यासंबंधीचं ट्विट केले. त्यात त्या म्हणाल्या, काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत  नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच

निवडणुका होतील अशी खंबीर पावलं उचलावी. सरकारकडून न्याय मिळेल हा विश्वास आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

 

शिंदे सरकारची भूमिका काय?

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने सुरु केली होती. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यास भाजपने विरोध दर्शवला होता. आता भाजप आणि एकनाथ शिंदेंची

शिवसेना यांचं सरकार आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जाहीर करण्यात आलेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच घेण्याची वेळ आली आहे. त्यात पंकजा मुंडेंच्या या मागणीला शिंदे सरकार काय उत्तर देतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं

आहे.

पंकजा मुंडे अॅक्टिव्ह होणार?

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांनी राज्यातील राजकारणात फार सक्रियता दाखवली नाही. 2019 ची विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर त्या भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यकारीणीत

सहागी झाल्या. त्यानंतर राज्यातील ओबीसींचे प्रश्न अथवा मराठवाड्यातील प्रश्न असो, पंकजा मुंडे या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रम अथवा आंदोलनांत सहभागी झाल्या नाही. विधानपरिषदेची उमेदवारी न

मिळाल्यानं त्या नाराज असल्याची चर्चा होती. मात्र महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्यानंतर त्या अचानक भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकांना हजेरी लावू लागल्या. आता ओबीसी आरक्षणावरून त्यांनी

ट्विटदेखील केलंय. राज्यातील मंत्रिमंडळातही पंकजा मुंडेंना संधी मिळेल, अशी चर्चा सुरु आहे. त्यातच त्यांनी ओबीसी आरक्षणावरून ट्विट केलंय. त्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा अॅक्टिव्ह होणार, अशी चर्चा आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.