बीड | वार्ताहर
प्रेम प्रकरणातून मुलाचा भोसकून खून झाल्याची घटना 25 जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील नाथापूर येथे घडली.या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी करत मयत मुलाच्या आईसह नातेवाईक महिलांनी 26 जून रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात येऊन टाहो फोडला.यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांच्याशी बोलणे करून दिले. आरोपीस ताब्यात घेतले असले असल्याची माहिती त्यांनी नातेवाईक महिलांना दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुंदर साहेबराव कसबे (२२,रा.पिंपळादेवी,ता. बीड ) असे मयताचे नाव आहे. तो ऊसतोड मजुरी करत होता. ऊसतोडीचे काम करताना त्याची ओळख लऊळ क्र.२ ( ता.माजलगाव ) येथील एका तरुणीशी झाली होती. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांपूर्वी ऊसतोडीहून दोन्ही कुटुंबे गावी परतले होते.प्रेमप्रकरणातून सुंदर कसबे याने मुलीला सोबत नेले होते. कुटुंबीयांनी विरोध केल्यावर त्याने पुन्हा त्यांच्या स्वाधीन केले होते. या साऱ्या प्रकारामुळे, मुलीचा भावाचा त्याच्याविषयी राग होता. २५ जून रोजी सुंदर कसबे हा आईसोबत नाथापूर येथे रिक्षातून आला होता. यावेळी रिक्षा अडवून त्याला पंपामागे नेऊन आरोपीने त्याच्या पोटात चाकूने वार केले.रक्ताच्या थारोळ्यात सोडून तो पळून गेला. यात सुंदरचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक बाबासाहेब खरात,पो.ना. रामप्रसाद कडुळे व सहकाऱ्यांनी तेथे धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान मुलाचा खून झाल्याने त्याचे कुटूंब हतबल झाले असून मारेकरी तात्काळ जेरबंद करून गरिब कुटुंबाला न्याय द्या असे म्हणत मयताच्या आईसह नातेवाईक महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात टाहो फोडला.दरम्यान रविवारी सुट्टी असल्याने वरिष्ठ अधिकारी नव्हते, उपस्थित अधिकाऱ्यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले. फोडला.यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांच्याशी बोलणे करून दिले. आरोपीस ताब्यात घेतले असले असल्याची माहिती त्यांनी नातेवाईक महिलांना दिली.
Leave a comment