नगर :
सध्या विधान परिषदेच्या उमेदवारींवरून नारजीनाट्याचा पाढा सुरू झालाय. तिकडे भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाथर्डी येथे पंकजा मुंडे समर्थकाकडून विषारी औषध घेण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र इतर कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवत प्राण वाचवले आहेत, इतर कार्यकर्त्यानी औषध घेताना हातातील डबा ओढून घेतला त्यामुळे हा कार्यकर्ता वाचला आहे. अन्याथा काहीतरी विपरीत घडण्याची जास्त शक्यता होती. मुकुंद गर्जे पंकजा मुंडे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. भावना अनावर न झाल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पिकांवर मारण्यात येणारे किडक नाशक औषध यावेळी त्याने घेण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारानंतर खबरदारी म्हणून गर्जे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Leave a comment