जिल्ह्यात 21 हजार 283 मुले, तर 14 हजार 355 मुली असे एकूण 35 हजार 638 विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण*
बीड | सुशील देशमुख
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल 8 जून रोजी दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. बीड जिल्ह्याने औरंगाबाद विभागात द्वितीय क्रमांक पटकावला असून जिल्ह्याचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल 95.9 टक्के लागला आहे.
औरंगाबाद विभागात औरंगाबाद जिल्ह्याचा सर्वाधिक 96.48 टक्के इतका निकाल लागला आहे. जालना जिल्हा विभागात तिसर्या स्थानी असून 93.98 टक्के इतका निकाल लागला आहे. या पाठोपाठ परभणी जिल्ह्याचा निकाल 93.25 टक्के इतका लागला आहे.
मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी बीड जिल्ह्यातून 37 हजार 786 मुला-मुलींनी अर्ज केले होते. या पैकी 22 हजार 390 मुले तर 15 हजार 86 मुली अशा एकूण 37 हजार 476 विद्यार्थ्यांनी प्रत्येक्षात बारावीची परीक्षा दिली. या पैकी 21 हजार 283 मुले, तर 14 हजार 355 मुली असे एकूण 35 हजार 638 विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 95.5 तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त म्हणजेच 95.15 इतकी असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुलीच हुशार असल्याचे दिसून आले आहे. बीड जिल्ह्यात बीड तालुक्याचा सर्वाधिक 96.22 टक्के इतका निकाल लागला आहे.मागील वर्षी म्हणजे 2021 मधे कोरोनामुळे बारावीची परीक्षा न होता अंतर्गत मुल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले होते.
बीड विभागात दुसऱ्या स्थानी
औरंगाबाद 96.48 टक्के
बीड 95.09 टक्के
जालना 93.98 टक्के
हिंगोली 93.52 टक्के
परभणी 93.25 टक्के
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*तालुकानिहाय निकाल*
बीड - 96.22
पाटोदा-93.25
आष्टी-93.35
गेवराई-95.48
माजलगाव-94.03
अंबाजोगाई-95.96
केज-95.90
परळी वैद्यनाथ-94.40
धारूर-94.20
शिरूर-94.93
वडवणी-95.14
**************
Leave a comment