जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या आश्वासनानंतर आ. लक्ष्मण पवार यांचे जल आंदोलन मागे
गेवराई | वार्ताहर
शनिवारी ता. 4 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह शेकडो महिला व पुरुष गंगावाडी परिसरातल्या गोदापात्रात जल आंदोलनासाठी उभे होते. तब्बल सात तास आमदार पवार पाण्यात उभे राहीले. पाच मिनिटे ही जागचे हालले नाहीत. टेंडर रद्द झाल्या शिवाय येथून जाणार नाही. अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतल्याने, अखेर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी माणुसकीचा धर्म पाळून थेट गोदापात्रात उतरून जल आंदोलन थांबवा, टेंडर रद्द करतो, असे आश्वासन दिले. त्यामुळे, शनिवार ता. 4 रोजी सात - आठ चाललेल्या आंदोलनाला यश आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी 6 जून रोजी तातडीने बैठक बोलावली असून, गंगावाडी वाळू घाटा संदर्भात विशेष चौकशी करण्यात येणार आहे. या बैठकीस स्वतः आमदार लक्ष्मण पवार यांना बोलावण्यात आले आहे.
वाळू ठेका रद्द करा, या एकाच मागणीसाठी अख्खा गाव एकवटला होता. सकाळी अकरा वाजता आमदार पवारांचे ग्रामस्थांसह गोदापात्रात जल आंदोलन सुरू झाले होते. दुपारी प्रशासनाकडून थातूरमातूर कागदाचा भेंडोळे नाचवण्यात आले. मात्र, मला नका विचारू, महिला म्हणत असतील तर जल आंदोलन मागे घेतो. अशी सरळ साधी भूमिका आ. पवारांनी घेतली. अखेर, जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आली.
ग्रामस्थांनी केलेली मागणी तातडीने निकाली काढून, गंगावाडी ता. गेवराई येथील वाळू टेंडर दोन दिवसात रद्द करण्याची एकमुखी मागणी करून, आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह ग्रामस्थांनी शनिवारी ता. 4 रोजी थेट गोदापात्रात उतरून जल आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान,अख्खा गाव एकवटला असून, टेंडर रद्द होत नाही तोपर्यंत गोदापात्रातून बाहेर येणार नाहीत, असा पवित्रा गावकरी व आमदार पवार यांनी घेतला होता.आ. पवार सात तास पाण्यात उभे होते. या परिसरातील महिलांनी आमदार लक्ष्मण पवारांना कडे करून त्या ही पाण्यात उतरल्याने वातावरण गंभीर झाले होते. आमचा जीव गेला तरी चालेल पण आंदोलन मागे घेणार नाही म्हणजे नाही. आमची लहान मुले ही येथे आणून जल आंदोलन करूत, अशी ताठर भूमिका त्यांनी घेतल्याने महसूल व पोलीस प्रशासन ही हतबल झाले होते.यावेळी आंदोलनात कार्यसम्राट आमदार लक्ष्मण पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड सुरेश हात्ते, पंचायत समिती सभापती दिपक सुरवसे, सदस्य प्रा. शाम कुंड, राजेंद्र राक्षसभुवनकर, सुशील जवंजाळ, बंडूभाऊ यादव, दादासाहेब गिरी, ग्रामपंचायत सदस्य दुरेश चिकणे, नामदेव कांबीलकर, हनुमंत चिकणे, भोगलगांवचे रामेश्वर मस्के, भाऊसाहेब यादव, देविदास फलके, कृष्णा मोरे, अॅड. सुरेश पवार, उद्धव मडके, ब्रह्मदेव धुरंधरे, लक्ष्मण चव्हाण, करण जाधव, महेश सौंदरमल, नगरसेवक राहुल खंडागळे, अजित कानगुडे, बददुभाई,युसूफ शेठ चाऊस, बाबासाहेब सावंत, यकीन पटेल मनोज हजारे, मुन्नाशेठ,कृष्णा पाटोळे, किशोर धोंडलकर, कृष्णा खटके, राहुल बेडके, शेख महंमद, अमोल मस्के, विठ्ठल मोटे, विठ्ठल हात्ते, अनेक जण उपस्थित होते.
Leave a comment