बीड | वार्ताहर
बीड शहरात चोरट्यांनी आपल्या 'कौशल्य विकासाचे' दर्शन घडवत शिवाजीनगर पोलिसांना तपासाचे आव्हान दिले आहे. सहसा रोख रक्कम, सोने, चांदीचे मौल्यवान दागिने चोर लंपास करतात.इथे मात्र चोरांनी टेबल, खुर्च्या लांबवल्या.
शहरातील नगर रोडवरील चंपावती शाळेच्या पाठिमागे असलेल्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातच चोरट्यांनी हात साफ केला.२६ मे रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी मार्गदर्शन केंद्रातील ४१ हजार रूपये किंमतीचे विविध साहित्य लंपास केले.यात लाकडी टेबल , स्टील टेबल, खुर्च्या आदी साहित्याचा समावेश आहे.याप्रकरणी जयदत्त इंगोले यांच्या फिर्यादीवरून ४ अज्ञाताविरूध्द शिवाजीनगर ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला.
Leave a comment