बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यामध्ये आरोग्य वर्धिनी केंद्र योजना सन 2019-20 मध्ये कार्यान्वित झाली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत 26 लाख 18 हजार 898 रुग्णांची तपासणी करण्यात आलेली असून, 1 लाख, 58 हजार 499 रुग्णांना मोफत सल्ला देण्यात आला आहे. तसेच रुग्णांसाठी एकूण 16 हजार 313 योग शिबिराचे आयोजन केले गेले असल्याचा दावा जिल्हा आरोग्य विभागाने पत्रकातून केला आहे.
आरोग्य वर्धिनी केंद्र अंतर्गत जिल्ह्यात 50 प्राथमिक आरोग्य केंद्र, 4 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व 243 उपकेंद्रांची निवड करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत 226 ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. समुदाय आरोग्य अधिकारी हे उपकेंद्र अंतर्गत गावात जाऊन आजाराबाबत तपासणी करतात.
आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत मिळतात या सेवा
गरोदर माता व बालकांची तपासणी, नवजात अर्भक सेवा, बालक व किशोरवयीन मुलांचे व मुलींचे आरोग्यसेवा, कुटुंबकल्याण कार्यक्रम, संसर्गजन्य आजाराचे व्यवस्थापन, सामान्य व किरकोळ आजारासाठी तपासणी, असंसर्गजन्य (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादि) रोग आजारांची तपासणी, प्रतिबंध व नियंत्रण, नेत्ररोग व कर्णाचे आजार, मौखिक आरोग्य, वृद्धत्व व उपशामक आजारांची काळजी, बर्न ट्रामा व आपत्कालिन सेवा, मासिक आरोग्य आजाराची तपासणी व मूलभूत व्यवस्थापन, योगा शिबिराचे आयोजन, रुग्णांसाठी ऑनलाइन तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे.
Leave a comment