मुंबई :
मोदी सरकारनंतरआता ठाकरे सरकारनेसर्वसामांन्यांना मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल-डीझेल आणखी स्वस्त झालं आहे. राज्य सरकारने मुल्यवर्धित करात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात घट झाली आहे. राज्य सरकारने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता पेट्रोल 2 रुपये 8 पैसे आणि डीझेलच्या दरात 1 रुपया 44 पैशांनी घट झाली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक 2 हजार 500 कोटींचा भार पडणार आहे. केंद्र सरकारने इंधनाच्या दरात कपात केल्यानंतर राज्य सरकारवर इंधनाच्या दरात कपात करण्याचा दबाव वाढला होता. तसेच राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर राज्य सरकारने व्हॅट कमी केल्याने महागाईने पिचलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने शनिवारी (21 मे) पेट्रोल-डीझेल स्वस्त केलं होतं. मोदी सरकारने केंद्रीय अबकारी करात घट केली. त्यामुळे पेट्रोल -डीझेलचे दर स्वस्त झाले होते. तसेच उज्जवला गॅस योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सिलेंडरचे दरही 200 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी याबाबतची माहिती दिली होती.
आतापासूनचे पेट्रोलचे नवे दर
मुंबई 109.45 पुणे 108.87 नाशिक 109.75 नागपूर 109.35 औरंगाबाद 110.95 परभणी 111.9 रत्नागिरी 110.77
पेट्रोलचे जुने दर
मुंबई 111.53 पुणे 110.95 नाशिक 111.83 नागपूर 111.43 औरंगाबाद 113.03 परभणी 113.98 रत्नागिरी 112.85
डिझेलचे जुने दर
मुंबई 97.45 पुणे 95.44 नाशिक 96.29 नागपूर 95.92 औरंगाबाद 98.95 परभणी 98.35 रत्नागिरी 97.29
Leave a comment