घराचा दरवाजा उघडे ठेवणे भोवले!
केज । वार्ताहर
विवाह सोहळ्याला जाण्याच्या घाई गडबडीत घराचा दरवाजा बंद न करता उघडा ठेवणे एका कुटूंबाला भोवले. पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी घरातून दागिणे व रोकड असा 92 हजारांचा ऐवज लंपास केला. युसूफवडगाव ठाणे हद्दीतील मौजे सनगाव येथे 21 मे रोजी ही घटना घडली.
ज्योतीराम नवनाथ अंजान (28,रा.सनगाव,ता.अंबाजोगाई) यांच्या घरात ही घटना घडली. 21 रोजी ज्योतीराम यांची पत्नी व आई या गावातील नातेवाईकांकडील विवाह सोहळ्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी त्यांनी घाई गडबडीत घराचा दरवाजा बंद न करता उघडा ठेवला. त्या विवाहसोहळ्याकडे जाताच इकडे चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची संधी साधत कपाट उघडून त्यातील सोन्याचे दागिणे व रोकड असा 92 हजारांचा ऐवज लंपास केला. घरी परतल्यानंतर हा प्रकार अंजान कुटूंबाच्या लक्षात आला.नंतर युसूफवडगाव ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. पोलीस आता तपास करत आहेत.
Leave a comment