बीड । वार्ताहर
दहा लाखांचे कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवून बीडमधील एका तरुणाची 1 लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार 2 मे रोजी समोर आला. या प्रकरणी दोन मोबाइल क्रमांकावरुन संपर्क साधणार्यांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
सचिन भागवत गायकवाड (रा.धानोरा रोड,बीड) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. 2 मे रोजी सचिन यांनी ‘धनी अॅप’वर कर्ज प्रकरणाची एक जाहिरात पाहिली. ती जाहिरात देणार्यांन त्यांचे मोबाइल क्रमांकही सोबत दिले होते. सचिन यांनी संपर्क साधल्यानतर ‘तुम्हाला दहा लाख रुपयांचे कर्ज मंजुर करुन देतो’ असे दोन वेगवेगळ्या मोबाइलवरुन संवाद साधणार्या भामट्यांती सांगीतले. शिवाय त्यांच्या खात्यावर व फोन-पे अॅपवर वारंवार पैसे पाठवण्यास सांगीतले. सचिनने कर्ज मिळेल म्हणून 1 लाख 7 हजार 506 रुपये संबधिताना पाठवले, मात्र त्यानंतरही कर्ज मंजुरीचे प्रकरण मार्गी लागले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यानी शिवाजीनगर ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी दोन मोबाइल धारकाविरुध्द फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस निरीक्षक केतन राठोड या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Leave a comment