बीड । वार्ताहर
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या वतीने हॉटेल अन्वीता येथे ग्राहक मेळावा अर्थात कस्टमर टाऊन हॉल मिटिंग घेण्यात आली. यामध्ये ग्राहकांना दर्जेदार सेवेबरोबरच वेळेमध्ये सेवा देण्याचे आश्वासन क्षेत्रीय प्रबंधक नंदकिशोर भोसले यांनी दिले. या मेळाव्यामध्ये शहरातील बहुसंख्य नागरिक आणि बँकेचे खातेदार सहभागी झाले होते.
भोसले यांनी उपस्थित ग्राहकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले. कस्टमर रिलेशन मॅनेजर आनंदकुमार बंडी यांनी ग्राहकांशी संवाद साधत बँकेच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली.लोण प्रोसेगींग मॅनेजर आनंदी मिश्रा यांनी ही कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ग्राहकांना महत्वाच्या सुचना केल्या. कमी वेळेत जास्त काम आणि ग्राहकांना सेवा देण्याचे भारतीय स्टेट बँकेचे वैशिष्ट असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले. यावेळी आभार प्रदर्शन सचिन घुगे यांनी केले.
Leave a comment