बीड शहरामध्ये सिंमेट रस्ता काम दोन महिने चालणार
बीड । वार्ताहर
बीड शहरामध्ये जालना रोड व बार्शी रोड या प्रमुख मार्गावर सोमेश्वर मंदीर ते काकु नाना हॉस्पीटल या दरम्यान नवीन काँक्रिट रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम पुढील साधारण दोन महिने चालण्याची शक्यता आहे. या कामामुळे या मार्गावर एकेरी वाहतुक सुरु आहे.बीड शहरातील नागरिकांना वाहतूक शाखेकडून खालील सुचना देण्यात येत असुन वाहतुक व्यवस्था सुरळीत चालावी व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सर्व सुचनांचे सर्व नागरिक व व्यापारी बांधव यांनी पालन करावे असे आवाहन बीड शहर वाहतूक शाखेने केले आहे.
शहरातील एकेरी मार्गावर वाहन चालवितांना लेनची शिस्त पाळुन वाहन चालवावे .सदर मार्गावर वाहन ओव्हरटेक करुन चालवू नये. सदर मार्गावर काही ठिकाणी उदा.आण्णाभाऊ साठे चौक, बॅरिकेटींग करुन तात्पुरत्या स्वरुपात केवळ एकेरी मार्ग करण्यात आलेले आहेत. बीड शहरातील नगर रोड भागातील नागरिकांनी सुभाष रोडवरील प्रमुख बाजारपेठेत जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक -राजुरी वेस - बलभीम चौक- धोंडीपुरा-माळीवेस मार्गे सुभाष रोड या मार्गाचा वापर करावा. बीड शहरातील नगर रोड भागातील ज्या नागरिकांना जालना रोडवरुन महालक्ष्मी चौक बायपास कडे अथवा गुरुकुल शाळा, सेंट अॅन्स स्कुल व पोद्दार स्कुल अथवा जुना मोंढा भागात जायचे आहे त्यांनी नगरनाका,कॅनॉल रोड-रिलायंस पेट्रोल पंप मार्गे जालना रोडवर जावे.
जालना रोडवरील महालक्ष्मी चौक-बीड बायपास कडुन येणार्या ज्या वाहनधारकांना नगर रोड भागात जावयाचे आहे अशा वाहनधारकांनी रिलायंस पेट्रोल पंप कॅनॅल रोड- नगर नाका या बायपास मार्गाचा करावा . 6. बीड शहरातील सुभाष रोड , माळीवेस भागातील ज्या नागरीकांना बस स्टैंड परिसर , नगर रोड परिसरात यावयाचे असेल अशा नागरीकांनी माळीवेस -धोंडीपुरा - बलभीम चौक- राजुरी वेस - छत्रपति शिवाजी महाराज चौक या मार्गाचा वापर करावा असे आवाहनही बीड शहर वाहतूक शाखेने केले आहे.
Leave a comment