बीड | वार्ताहर

 

जिल्ह्यात नव्याने मंजूर असलेल्या नळ पाणीपुरवठा योजना व दुरुस्तीसाठी मंजूर असलेल्या योजनांची लोकवर्गणी जमा करणे आणि सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांची पाणीपट्टी जमा करण्यासाठी 22 मार्च जागतिक जलदिनानिमित्त प्रत्येक गावात विशेष जनजागृती उपक्रम घेणार असल्याची माहिती बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिली.

 

जिल्ह्यात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या वतीने   22 मार्च जागतिक जलदिनानिमित्त ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रम घेण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.नव्याने मंजूर केलेल्या व दुरुस्तीसाठी मंजूर असलेल्या पिण्याच्या पाण्याचे नळ योजना यांना 10 टक्के लोकवर्गणी जमा करणे बंधनकारक आहे. लोकवर्गणी जमा झाल्याशिवाय योजनांचा निधी खर्च करण्यास परवानगी नाही लोकवर्गणी जमा करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम घेण्यात येणार आहे.

 

सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनांमध्ये मार्चअखेर पाणीपट्टी जमा होण्याकरिता पाठपुरावा सुरू आहे त्यामुळे पाणीपट्टी जमा करण्यासाठी ग्राम पाणी पुरवठा समिती व ग्रामपंचायत तसेच अंमलबजावणीस सहाय्य संस्था यांच्या वतीने गृहभेटी अभियान घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिली. नळ पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत स्वच्छ करणे तसेच परिसरातील स्वच्छतेसाठी श्रमदान करणे, 100 टक्के नळ जोडणी करण्यासाठी पाठपुरावा करणे, उपलब्ध असलेले जलस्त्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचे क्लोरिनेशन म्हणजेच निर्जंतुकीकरण होणार आहे.

 

शाळा अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांना नळजोडणी देणे बंधनकारक असल्याने पहिल्या टप्प्यात 100 टक्के नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहेत.पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासणीसाठी राज्य शासनाकडून तपासणी किट उपलब्ध करून दिले असून गावातील पाणी गुणवत्ता संबंधित काम करणाऱ्या पाच महिलांच्या मदतीने पाणी तपासणी होणार आहे. या तपासणीमध्ये बाधित असणाऱ्या स्त्रोतांची निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम घेणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या वतीने कोबो या ऑनलाईन पद्धतीने 1367 गावातील नळपाणी पुरवठा योजनांची अंदाजित माहिती भरून देण्यात आलेली आहे. सध्या मंजूर असलेल्या आराखड्याची माहिती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणीचे काम सुरू आहे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे साठी सामुहिक व सार्वजनिक शोषखड्डे व परसबागा तसेच जादूचा शोषखड्डा घेऊन पाणी मुरवण्याची मोहीम हाती घेतली असल्याची माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता नामदेव उबाळे यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.