शिवसैनिकात आनंद; बीड,गेवराई, आष्टी,पाटोदा विधानसभेची जबाबदारी
बीड | वार्ताहर
जिल्हा प्रमुख पदावर असताना कुंडलिक खांडे यांच्यावर गुटखा प्रकरणात कारवाई झाल्याने गत ४ महिन्यांपासून रिक्त असलेल्या बीड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची धुरा पुन्हा एकदा कट्टर शिवसैनिक तथा यापूर्वी तब्बल 13 वर्ष शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहिलेले अनिलदादा जगताप यांच्याकडे सन्मानाने सोपविण्यात आली आहे.मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच अनिल जगताप यांची प्रभारी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
अनिलदादा जगताप यांची ही नियुक्ती आगामी घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन प्रभारी करण्यात आली आहे.बीड,गेवराई,आष्टी,पाटोदा विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी आता अनिल जगताप यांच्याकडे असणार आहे.
या कालावधीत केलेल्या कार्याचा आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सदर नियुक्ती कायम करण्यात येईल असेही शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे .
तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेवर गुटखा प्रकरणात कारवाई झाली होती. त्यामुळे हे पद ४ महिन्यांपासून रिक्त होते. मात्र आता अनिल जगताप यांच्याकडे ही मोठी आणि महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने बीड जिल्हा शिवसेनेत पुन्हा एकदा 'जगताप पर्व' सुरु झाले आहे.
Leave a comment