बीड | वार्ताहर
येथील मुद्रांक व नोंदणी कार्यालयात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गोळीबार झाला. यात दोघे जखमी झाले असून या घटनेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सतीश बबन क्षीरसागर (३०, लक्ष्मणनगर ,बीड) व फारूक सिद्दीकी (२८ , जालना रोड, बीड) अशी जखमींची नावे आहेत. ते दोघे २५ फेब्रुवारी रोजी सकाळी येथील मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. यात दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.उपअधीक्षक संतोष वाळके, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक रश्मीता एन. राव, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली असून जमिनीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्यासह प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक रश्मीथा एन राव यांनी धाव घेतली.दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ सील केले, पुढील तपास सुरू सुरू असून वर्दळीच्या आणि गजबजलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Leave a comment