मुंबई । वार्ताहर
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालवली आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दीदींना ८ जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात खल करण्यात आले होते. गेले 27 दिवस त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या लवकरात लवकर बरं वाटवे यासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जातायेत.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. याबाबतची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, रुग्णालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्थेत देखील वाढ करण्यात आली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे. लता मंगेशकर यांचे वय 92 वर्ष आहे.
लतादीदींना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर गेल्या 27 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी, उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात 'प्रभू कुंज' जवळील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले होते. काही दिवसांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी निवेदन दिलं होतं. लता दीदींच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती देणं शक्य नाही. ती गोपनीय बाबतीत थेट घुसखोरी होईल. कृपया प्रकृतीबाबत कोणत्याही त्रासदायक अफवा पसरवू नका, असं निवेदनात म्हटलं होतं.
6-7 दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढले होते
गेल्या ६-७ दिवसांपूर्वी डॉक्टरांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने व्हेंटिलेटर काढले होते. तेव्हा डॉक्टर प्रतित समदानी यांनी सांगितले होते की, त्यांची प्रकृतीत सुधारणा आहे, त्यामुळे त्यांचं व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले आहे, परंतु त्या आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
मध्यंतरी प्रकृतीत झाली होती सुधारणा, आरोग्य मंत्र्यांनी दिली होती माहिती
पाच दिवसांपूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लता दीदींच्या प्रकृतीविषयी माहिती देताना सांगितले होते की, 'मी लता दीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोललो. त्या ब-या होत आहेत. त्यांनी कोरोना आणि न्यूमोनियावर मात केली आहे. त्या काही काळ व्हेंटिलेटरवर होत्या, पण आता त्यांचे व्हेंटिलेटरही काढून टाकण्यात आले आहे. 15 दिवसांच्या उपचारानंतर त्या व्हेंटिलेटवर नाही. त्यांना फक्त ऑक्सिजन दिला जात आहे. लता दीदी सतत डोळे उघडत आहेत. कोरोनामुळे त्या थोड्या अशक्त झाल्या आहेत, पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.'
परंतु नुकत्याच आलेल्या माहितीनुसार लता दीदींची तब्येत खालावली असून चाहते त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी सदिच्छा व्यक्त करत आहेत.
याआधीही नोव्हेंबर 2019 मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना 28 दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.
Leave a comment