अंबाजोगाईत कत्तलखान्यावरील छाप्यात गोमांस जप्त

अंबाजोगाई । वार्ताहर
केज तालुक्यातून आलेला एक टेम्पो जप्त करून त्यातून कत्तलीसाठी अंबाजोगाईत आणलेल्या 15 गाईंची अंबाजोगाई पोलीसांनी सुटका केली. तसेच, शहरातील बारभाई गल्लीत्तील कत्तलखान्यावर छापा मारून दोन गोवंशीय जनावरांचे मांस जप्त करण्यात आले. ही दुहेरी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, त्यांचे पथक आणि शहर पोलिसांनी गुरुवारी (दि.03) सायंकाळी 7 वाजता केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील साळेगाव येथून एका टेंपोतून अंबाजोगाईतील कत्तलखान्याकडे जनावरे आणण्यात येत असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी सुनील जायभाये यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सदरील टेंपो (एमएच 14 एएच 6149) स्वाराती रूग्णालयाजवळ पकडला असता त्यात 15 गोवंशीय जनावरे असल्याचे आढळून आले. दुसरी कारवाई बाराभाई गल्लीत करण्यात आली. येथील एका कत्तलखान्यावर छापा मारून पोलिसांनी दोन गोवंशीय जनावरांचे मांस जप्त केले असून पुढील कार्यवाही नगर पालिकेकडे सोपविण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी आतपर्यंत तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सदर दुहेरी कारवाई डीवायएसपी जायभाये, त्यांच्या पथकातील सतीश कांगणे, अतकरे, शहर ठाण्यातील पोलीस कर्मचारी घोडके, बारगजे, पठाण यांनी पार पाडली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.