नवी दिल्ली :
सुप्रीम कोर्टाकडून भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याने भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन केलं होतं. यानंतर भाजपने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अतुल भातखळकरांसह माजी मंत्री गिरीष महाजन यांचाही त्यामध्ये समावेश होता. यंदा हिवाळी अधिवेशनात त्यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी भाजपने केली होती. मात्र, एक वर्षाच्या निलंबनावर सरकार ठाम असल्याचं दिसलं. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने भाजपला दिलासा दिला आहे.
राज्यातील भाजपच्या 12 आमदारांचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी निलंबन केले होते. हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
भाजपाचे १२ निलंबित आमदार -
गिरीश महाजन
जयकुमार रावल
आशिष शेलार
संजय कुटे
अतुल भातखळकर
पराग अळवणी
राम सातपुते
नारायण कुचे
योगेश सागर
अभिमन्यू पवार
आमदारांचे निलंबन रद्द का झाले?
1. आर्टिकल १९० (४) नुसार केवळ ६० दिवसांसाठीच आमदारांचे निलंबन करण्याचा नियम आहे. परंतु महाराष्ट्र सरकारनं १ वर्षासाठी निलंबन केलं. जे कायद्यानं चुकीचं आहे.
२. आमदार मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. म्हणून १ वर्षासाठी निलंबन करणं हा मतदारांवर अन्याय असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
( सविस्तर बातमी थोड्या वेळात )
Leave a comment