चौसाळा । वार्ताहर

 

कै.चांदमलजी लोढा प्रा.मा.व उच्च मा.विद्यालय चौसाळा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला नीट परीक्षा 2020- 2021 मध्ये या प्रशालेचा विद्यार्थी चि.विवेक मुरलीधर विधाते याने 720 पैकी 530 गुण घेऊन वैद्यकीय शिक्षण (एम बी बी एस) साठी पात्र होऊन घवघवीत यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल  संस्थेचे सचिव अशोक लोढा (जि.प. सदस्य) चौसाळा तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ.संगीता ताई अशोक लोढा यांच्या हस्ते चि.विवेक विधाते, मुरलीधर विधाते व सौ.शोभा विधाते यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.

 



यावेळी विवेक विधाते याने आपले मनोगत व्यक्त करताना इयत्ता पहिली पासूनच या शाळेमध्ये मला ज्ञान व कौशल्य मिळाले त्यामुळेच मला प्राथमिक शिक्षण घेत असताना शाळेतील सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले माध्यमिक शिक्षण घेत असताना विज्ञान,गणित, इंग्रजी या विषयांचा पाया मजबूत केल्यामुळे मी आज नीट परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊ शकलो आमच्या शाळेचे सर्व शिक्षक उपक्रमशील असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मला शैक्षणिक ज्ञानाबरोबरच  सामाजिक जाणीव या उपक्रमाच्या  द्वारे भविष्यामध्ये करावयाच्या कार्याची ओळख करून दिली.



तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक लोढा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विवेक विधाते यांचे अभिनंदन व कौतुक केले डॉक्टर पेशामध्ये पैसा म्हणून न पाहता एक सामाजिक बांधिलकी व समाज सेवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कर्तव्य जोपासावे व किर्ती जपावी असे मोलाचे मार्गदर्शन केले याप्रसंगी ह.भ.प.श्रीधर बापू ढास जेष्ठ विचारवंत यांनी आपल्या मनोगतात रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्या गुरु-शिष्य परंपरेचा उल्लेख करत विवेक विधातेला स्वामी विवेकानंदाप्रमाणे आदर्श जीवन कसे जगावे याविषयी मार्गदर्शन केले.तसेच जि. प.माध्यमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक शेटे सर यांनी विवेकच्या यशामागे शाळेचे,शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे,असे नमूद केले. डॉ.मंचुके,डॉ.शेंडगे  यांनी मोलाचे मार्गदर्शन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यासूत्रसंचालन भाकरे सर यांनी केली प्रस्ताविक महामुनी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राऊत सर यांनी केले. यावेळी चौसाळा व चौसाळा पंचक्रोशीतील विविध राजकीय मंडळी व कर्तबगार मंडळी उपस्थित होते. चौसाळा चे सरपंच श्री.मधुकर तोडकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीधर बापू ढास,भीमराव विधाते (मा. जि. प सदस्य) चंद्रसेन गुंजाळ (चेअरमन) डॉ.मंचुके साहेब (वैद्यकीय अधिकारी चौसाळा)डॉ. शेंडगे,डॉ.मोटे साहेब,डॉ.जोगदंड साहेब डॉ.निनाळे तसेच सुरेश नाना हुलजुते, माजी मुख्याध्यापक शेटे सर (जि.प.मा.शा चौसाळा) छत्रभुज वाघमारे (मा.सरपंच) रमन कोचर, सतीश कोचर, सुभाष शेठ बोरा, संतोष नाईकवाडे, चोळसे विलास,सोनवणे विक्रम,शिवाजीराव विधाते,अशोक जोगदंड, रमेश तांदळे (चेअरमन)राजाभाऊ मुंडे, पी.जी.कुलकर्णी साहेब (कृषी अधिकारी) लिंगे कुंडलिक हे उपस्थित होते तसेच चौसाळा केंद्रातील शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती गंगाखेडकर मॅडम, केंद्रप्रमुख शंकर पाटील सर, केंद्रीय मुख्याध्यापक अशोक जाधव सर,नवजीवन शिक्षक पतसंस्था चेअरमन श्री महारुद्र झोडगे सर हे उपस्थित होते तसेच लोढा शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.प्रमिला ताई नाईकवाडे,तसेच सौ.निकिता ताई अक्षय लोढा,अंगणवाडी शिक्षिका पवार मॅडम,लिंगे मॅडम,बारवकर मॅडम,तोडकर मॅडम,सर्व आशा वर्कर,सौ.निकिता ताई लोढा सौ.ज्योती फुलवरे, माया विधाते  महिला व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.चौसाळा पत्रकार संघाचे मार्गदर्शक बळीराम राऊत, पंडित जोगदंड,विकास नाईकवाडे,अजमेर मनियार, प्रकाश व्यवहारे, सुधीर चौधरे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.