वाग्देवता वक्तृत्व सरस्वती चषकाची मानकरी
बीड । वार्ताहर
माझा भारत - नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राष्ट्रउत्थानाचे साधन या विषयावर दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी धर्मवीर संभाजी विद्यालय औरंगाबाद येथे विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा सस्ंथान तर्फे कैं.मनोहर करंदीकर स्मृती प्रीत्यर्थ वयोगट 16 ते25 महाविद्यालयीन
विद्यार्थासाठी वाग्देवता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा. मधूश्री सावजी (मंत्री, विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान),मुकेशजी गोयंका (अध्यक्ष, विद्याभारती,औरंगाबाद महानगर समिती),मालती ताई करंदीकर (मार्गदर्शक, विद्याभारती), नारायण बाभुळगावकर(मु. अ. धर्मवीर संभाजी शाळा) इ मान्यवर तर बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.सर्जेराव ठोंबरे( उपाध्यक्ष,पं. दि. उपाध्याय शिक्षण संस्था) प्रकाश पोतदार, (मंत्री, विद्याभारती देवगिरी प्रांत),प्रकाश बाविस्कर पदाधिकारी आणि अजिनाथ शिंदे, (उपसंपादक, पुण्यनगरी, अहमदनगर),भरत रिडलोन, यांनी परीक्षक म्हणनू काम पाहिले. दिनेश देशपांडे, रमाकांत सरोदे,महेश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.डॉ.प्रकाश बाविस्कर (स्पर्धा प्रमुख, महाविद्यालय विभाग, विद्याभारती) यांनी विशेष परिश्रम घेतले.अर्चना ताई नरसापूर,डॉ.गौरी ताई देशपांडे,लता ताई पाठक इ सहभाग स्पर्धा यशस्वी तेसाठी लाभला.
ही स्पर्धा जर सर्वांपर्यंत पोहोचली तर खर्या अर्थाने राष्ट्रुत्थानाचे कार्य घडेल,भारत पुन्हा विश्वगुरु स्थानी पोहोचेल. स्पर्धेत व्यक्त झालेले विचार पोहोचविण्याचे कार्य मालती ताईंच्या हस्ते होत असल्याचे समारोप प्रसंगी सर्जेराव ठोंबरे यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले. मागील सहा वर्षापासून सातत्याने चालू असणार्या या स्पर्धेतील सहभागाने मुलांचा आत्मविश्वास वाढत आहे. महाविद्यालय तरुण-तरुणींना तरुण-तरुणींना सहजतने मुलाखती देता येतात असा अनभुव आहे.बक्षीस मिळवण्यासाठी स्पर्धेत येणे हा एक भाग असला तरी बुद्धी करीत असलेल्या विचार व्यक्त करण्याची संधी म्हणनू या स्पर्धेकडे स्पर्धक बघतात अशी ही आगळीवेगळी स्पर्धा शभुकंर देव शिकागो यांच्या सकंल्पनेतनू आयोजित केलेली आहे.या स्पर्धेच्या पारितोषिक स्वरूपात प्रथम पारितोषिक रुपये 7000 विद्याभारती वाग्देवता फिरता सरस्वती चषक आणि प्रमाणपत्र तेजस्विनी केंद्रे हिने दुसर्यांदा सलग प्राप्त केले, द्वितीय क्रमांक रुपये 5000 आणि प्रमाणपत्र जालिंदर जगताप आणि पौर्णिमा तोतेवाड, तृतीय क्रमांक रुपये 3000 आणि प्रमाणपत्र अक्षय काकडे तसेच रुपये 500 चे उत्तेजनार्थ पारितोषिक राम जाधव, अथर्व पळसकर, रामेश्वर कांबळे, भागवत लाड, संदीप कोळेकर, संकेत पवळे, विशाल थोटे, अश्विनी घुगे या विद्यार्थ्यांना मिळाली. जालना,औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण अशा प्रांतातील विविध महाविद्यालयातुन 12 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मालती करंदीकर या स्वतःजातीने हजर राहून सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करतात.तसेच पढुील वर्षीचा विषय देखील विद्यार्थीच सुचवतात.दरवर्षी दिनांक 22 जानेवारी रोजी हि स्पर्धा होत असते.पुढील वर्षी देखील जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे अशी संयोजकांनी आवाहन केले आहे.
Leave a comment