औरंगाबाद । वार्ताहर

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारण यांच्यासोबत अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मला मिळणार आहे. माझ्यासाठी ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. देशाची आर्थिक स्थिती खूप सक्षम झाली आहे, अशी प्रतिक्रिया अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.औरंगाबादकर आणि संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी बातमी आहे. मराठवाड्याचे सुपुत्र आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड  हे अर्थमंत्री निर्मला सीतारमण  यांच्यासोबत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण जनतेसमोर सादर करतील. अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे त्यांच्यासोबत बजेटमधील काही भाग सादर करतील. अर्थसंकल्प सादर करायला मिळतोय, हे माझं भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. भागवत कराड यांनी  बोलताना व्यक्त केली.

अर्थसंकल्प सादर करायला मिळतोय, हे माझं भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. भागवत कराड यांनी  बोलताना दिली आहे.

माझ्यासाठी ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. देशाची आर्थिक स्थिती खूप सक्षम झाली आहे. जीएसटीचं मासिक उत्पन्न 1 लाख कोटी अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्ष 1 लाख 31 हजार कोटी मासिक उत्पन्न मिळालं आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे, असं भागवत कराड यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी यावेळी बोलताना राज्यातील इतर मंत्र्यांवर गंभीर आरोप केले. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या बैठकीला राज्यातील अर्थ मंत्र्यांनी दांडी मारली. पत्र पाठवून आणि सूचना करूनही अर्थमंत्री बैठकीला गैरहजर राहिल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे राज्याची नेमकी आर्थिक स्थिती समोर येऊ शकली नाही, असा आरोपही डॉ. भागवत कराड यांनी केला आहे.

दरम्यान,संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु होणार आहे. याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.

31 जानेवारी ते 8 एप्रिल या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडेल. दोन टप्प्यात हे अधिवेशन असणार आहे. देशात फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर केंद्र सरकार काय घोषणा करणार याकडे लक्ष लागून राहणार आहे.

शेतकऱ्याचा मुलगा ते केंद्रीय मंत्री.....

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे खासदार डॉ. भागवत कराड यांचाही समावेश आहे. कराड यांच्या रुपाने एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती थेट केंद्रीय मंत्री होणार आहे. डॉ. भागवत कराड नक्की कोण आहे त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे? यावर टाकलेली ही नजर…

कराड यांचं संपूर्ण नाव डॉ. भागवत किशनराव कराड असं आहे. त्यांचा जन्म १६ जुलै १९५६ रोजी एका शेतकरी कुटुंबामध्ये झाले. त्यांनी एमबीबीएस, एम.एस.(जनरल सर्जरी), एम. सीएच(पेडियाट्रीक) या पदव्यांचं शिक्षण घेतलं आहे. कराड हे मूळचे लातूरचे आहेत. डाॅ. कराड हे बालरोग शल्यचिकित्सक आहेत.

शेतकरी कुटुंबात जन्मलेले डाॅ. भागवत कराड हे लातूरचे आहेत.  ‘डाॅ. कराड मल्टी स्पेशालिटी हाॅस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ हे त्यांचं स्वत:चं हाॅस्पिटल देखील आहे. १९९५ साली औरंगाबाद महानगरपालिकेच्या कोटला काॅलनी येथून ते अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहकार्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला.

१९९८ साली औरंगाबाद शहराचा उपमहापौर म्हणून त्यांची निवड झाली. नंतर १९९९ आणि २००६ असे दोन वेळा ते औरंगाबाद शहराचे महापौर होते. २००९ साली गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. २०२० मध्ये डाॅ. कराड यांना भाजपाकडून राज्यसभेची खासदारकी देण्यात आली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.