शासकीय वाहनावर दगडफेक करत शिवीगाळ

परळी तालुक्यातील धर्मापूरीतील घटना;पाच जणांवर गुन्हा

 

परळी । वार्ताहर

नाकाबंदीदरम्यान पोलीसांनी कार थांबवली म्हणून संतापलेल्या पाच जणांनी पोलीस पथकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने काळ्या रंगाची कार भरधाव आणत पोलीसांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शिवाय पोलीस उपनिरीक्षकाचा मोबाइल,शासकीय ई-चलन मशीन आणि प्रिंटर फोडून नुकसान करत महिला पोलीस अंमलदाराबद्दल अपशब्द टाकून पलायन केले. 1 जानेवारी रोजी तालुक्यातील धर्मापूरी येथे  रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

नववर्षानिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या गेल्या. परळी तालुक्यातील धर्मापूरी येथील टी पाँईन्टनजिक पोलीसांनी नाकाबंदी केली होती. यादरम्यान येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना थांबवत त्यांची तपासणी तसेच माहिती विचारली जात होती. याचदम्यान कार क्र.(एम.एच.44 टी 4599) तपासणीसाठी पोलीसांनी थांबवली; मात्र कार थांबवल्याच्या रागातून अच्युत मुरकुटे, वाहेद खान, अशोक तिडके (पुर्ण पत्ता नाही)  व त्यांच्यासोबतच्या अन्य अनोळखी दोघांनी संगणमत करत काळ्या रंगाची कार भरधाव आणत पोलीसांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ केली.

 

 

यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे यांचा मोबाइल, शासकीय ई-चलन मशीन आणि प्रिंटर फोडून नुकसान केले.शिवाय महिला अंमलदाराबद्दल अपशब्द वापरुन पुन्हा एकदा कार भरधाव वेगात पोलीसांच्या अंगावर घालून पोलीसांच्या शासकीय वाहनाची क्र.(एम.एच.23 एफ 9921)पाठीमागील काच फोडून नुकसान केले. उपनिरीक्षक गणेश झांबरे यांच्या फिर्यादीवरुन पाच जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम व इतर कलमानुसार परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.