बीड | वार्ताहर
जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी, गेवराई व धारूर या मुदत संपणाऱ्या सहा नगर परिषदेसाठी आता प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत.आहेत.यामुळे नगरपरिषद निवडणूक लढवण्यासाठी आतुर झालेल्या इच्छुकांना आता आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.
नगर परिषद निवडणूक प्रक्रिया आगामी दोन, तीन महिन्यात पार पडणार होती, मात्र पुन्हा एकदा जगभर पसरलेल्या साथरोग कोव्हिड-19 च्या राज्यात झालेल्या संक्रमनामुळे सार्वत्रिक निवडणुकांसाठीची प्रकिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याचे तसेच मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही वेळ लागणार असल्याचे स्पष्ट करत मुदत संपल्यानंतर संबंधित स्थानिक संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने 27 डिसेंबर रोजी शासन निर्णय घेत मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातील 45 नगर परिषद व 2 नगर पंचायतची मुदत संपताच प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, माजलगाव,परळी, गेवराई व धारूर या सहा नगर परिषदेची मुदत संपताच तिथे प्रशासक नियुक्त करावा लागणार आहे.
Leave a comment