बाळांनो काळजी करू नका-माजीमंत्री क्षीरसागर
बीड । वार्ताहर
कडवट आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे बीड येथील सुमंत रुईकर (48)यांचे दि.25 डिसेंबर रोजी निधन झाले. रुईकर कुटुंबियाला केवळ धीर नव्हे तर कायमचा आधार देऊ असे सांगून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रुईकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आधाराचा शब्द दिला.त्यांनी सुमंत रुईकर यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुमंत रुईकर व त्यांचा अन्य एक मित्र हे बीड ते तिरुपती बालाजी असा 1100 कि.मी.चा पायी प्रवास चालू असताना त्यांना दोन-तीन दिवस ताप आला होता. त्यामुळे त्यांना कर्नाटक राज्यातील रायचूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे शनिवारी (दि.25) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. नंतर रविवारी दुपारी बीड येथे त्यांचा अंत्यविधी झाला.त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

रविवारी सायंकाळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रुईकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आधार दिला.यावेळी सुमंत रुईकर यांच्या पत्नी किर्ती रुईकर म्हणाल्या,अण्णा तुम्हीच आता आम्हाला उद्धवजी ठाकरे आहात, माझे कुटुंब उघड्यावर पडले आहे. पाच जणांचा सांभाळ मला करावा लागणार आहे.त्यामुळे तुम्हीच माझ्या कुटुंबाला सावरू शकताअशा भावना व्यक्त केल्या.यावर रुईकर कुटुंबियाला कायमचा आधार देऊ अशी ग्वाही जयदत्त क्षीरसागर यांनी दिली. यावेळी प्रा.किशोर काळे, गणेश तालखेडकर व परिसरातील नागरिक उपस्थित उपस्थित होते.
बाळांनो,काळजी करु नका
माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रुईकर कुटुंबियांची घरी जावून भेट घेतली. यावेळी सुमंत रुईकर यांची कन्या ऐश्वर्या आणि मुलगा आर्यन हे दोघे जयदत्त क्षीरसागर यांच्या जवळ जाऊन बिलगले, तेव्हा बाळांनो काळजी करू नका असा धीर देत कुटुंबियांचे सांत्वन केले.

Leave a comment