परभणी । वार्ताहर
कोल्हापूर जिल्हयातील मोहोड येथे दि. 11-12 डिसेंबर 2021 पासून शुटींंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील स्पर्धेसाठी परभणी जिल्हयातील वरीष्ठ गट मुले व मुलींचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दि. 10 डिसेंबर 2021 रोजी सायं. 7 .00 वा. परभणी येथून रवाना झाला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष परभणी विधानसभा मतदार संघाचे आ. डॉ. राहुल पाटील यांनी खेळाडूंना गणवेश वाटप करून राज्य स्पर्धेसाठी जाण्याची परवानगी देत सर्व खेळाडुंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यानंतर आ. डॉ. राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे सचिव जगदीश नवले, लेफ्टÞजनरल फुलचंद सराफ़, मोहम्मद गौस झैन, नगरसेवक इमरान हुसैनी, तुडमे सावकार, निसार खान, अॅड़ प्रताप नवले, समाजभूषन बशीर अहेमद,अब्दुल रशीद, मुन्ना खान, गणेश दासरी आदी उपस्थित होते. सर्वांनी संघातील सर्व खेळाडुंचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
सुत्र संचलन उबाळे सर व संघटनेचे सचिव मोहम्मद एकबाल सर यांनी केले. कार्यर्कम यशस्वीतेसाठी रिझवान एकबाल, इजराईल, तुडमे, अरबाज सय्यद आदींनी परिश्रम घेतले.
Leave a comment