नेकनूर | वार्ताहर
बीड तालुक्यातील नेकनूरपासून जवळच असलेल्या नांदुरफाटा येथे एका चिमुकलीचा मृतदेह बंधार्यात तरंगताना आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना आज शनिवारी (दि.11) सकाळी उघडकीस आली.घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी धाव घेतली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेकनूरच्या रुग्णालयात आणण्यात आला आहे.
अक्षरा बाबासाहेब पडूळकर (वय14 महिने) असे त्या मयत मुलीचे नाव आहे. बाबासाहेब पडूळकर यांच्या घराशेजारी बंधारा असून अक्षरा कालपासून बेपत्ता होती. शनिवारी सकाळी तिचा मृतदेह बंधार्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शेख मुस्तफा यांच्यासह कर्मचारी क्षीरसागर, सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेकनूरच्या रुग्णालयात आणण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
Leave a comment