बीड | वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग कमी होत असून शनिवारी (दि.३०) कोरोनाचे केवळ ८ नवे रूग्ण निष्पन्न झाले तर १३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
शुक्रवारी जिल्ह्यातील १ हजार १८ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी १ हजार १० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर केवळ ८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. बाधित रूग्णांमध्ये अंबाजोगाई, गेवराई, पाटोदा तालुक्यात प्रत्येकी १, आष्टी ३ व माजलगाव तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.
सुदैवाने गत चोवीस तासात मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली नाही.त्यामुळे आजपर्यंतची एकूण रुग्ण मृत्यू संख्या २ हजार ८०५ इतकी स्थिर आहे. दिवसभरात १३ जण कोरोनामुक्त झाल्याने एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ३४९ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ३ हजार २७७ इतकी झाली असून सध्या जिल्ह्यात केवळ १२३ रुग्ण उपचाराखाली आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी दिली.
Leave a comment