बीड | वार्ताहर
जिल्हा पोलिस दलातील ४७३ कर्मचार्यांच्या विनंती बदल्यांचे आदेश बुधवारी (दि.६) पोलिस अधिक्षक आर.राजा यांनी काढले. कर्मचाऱ्यांच्या बदलाची ही सर्व प्रक्रिया येथील
पोलिस मुख्यालयात पार पडली.
पोलिस ठाणे, शाखा येथे नेमणुकीत असलेल्या कर्मचार्यांच्या विनंतीवरून समुपदेशनाद्वारे बदल्यांची प्रक्रिया पार पडली. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर संबधित कर्मचार्यांना बोलावण्यात आले होते. त्याच ठिकाणी ही प्रक्रिया पार पडली. दरम्यान पती-पत्नी दोघेही शासकीय नौकरीत असतील तर बदली प्रक्रियेमध्ये पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत विचार केला जातो. कर्मचार्यांच्या विनंती बदल्या होत असतांना एखाद्या कर्मचार्याची पत्नी अन्य विभागात शासकीय नौकरीस असल्यास आणि संबंधित कर्मचार्याने पती-पत्नी एकत्रीकरणास पसंती दिल्यास त्यानुसार बदली केली जाते. मात्र जिल्हा पोलिस दलात विनंती बदल्या प्रक्रियेत पती-पत्नी एकत्रीकरणाच्या नियमाकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचार्यांमधुन नाराजी व्यक्त झाली.
Leave a comment