1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान आयोजन
अल्पदरात मोतीबिंदू नेत्रशस्त्रक्रिया होणार
बीड | वार्ताहर
येथील जालना रोडवरील आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर येथे 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मोफत नेत्रतपासणी तसेच अल्पदरात मोतीबिंदू नेत्रशस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने या ठिकारी रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली जाणार असून जिल्ह्यातील अधिकाधिक नेत्र रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड व पदाधिकार्यांनी केले आहे.
आनंदऋषिजी नेत्रालय व खटोड प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वीही बीड येथील आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटरमध्ये मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात ब्रॅन्डेड चष्मे वितरण करण्यात आलेले आहे. बीड येथील या व्हिजन सेंटरच्या माध्यमातून गत 12 महिन्यात 3 हजार 250 रुग्णांच्या अल्पदरात यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून आता 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत पुन्हा शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गौतम खटोड यांनी दिली.
या दीड महिन्यात जवळपास 4 हजार रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्याचा संकल्प आहे. या ठिकाणी नेत्र तपासणीबरोबरच अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया अहमदनगर येथील आनंदऋषीजी रुग्णालयात केल्या जाणार आहेत. तसेच अल्पदरात ब्रॅन्डेड चष्मे वितरित केले जातात. बीड येथील व्हिजन सेंटरमध्ये दररोज सकाळी 9 ते सायं. 7 या वेळेत रुग्णांची नेत तपासणी केली जाणार आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी स्व.झुंबरलाल खटोट प्रतिष्ठान परिश्रम करत आहे.
Leave a comment