बीड । वार्ताहर
जिल्ह्यात आज सोमवारी (दि.४) अंबाजोगाई,आष्टी, बीड, धारूर, गेवराई, परळी, पाटोदा व शिरूरकासार या आठ तालुक्यात कोरानाचे केवळ १७ नवे रुग्ण निष्पन्न झाले.
रविवारी जिल्ह्यातील १ हजार १०३ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल सोमवारी दुपारी प्राप्त झाले. यात १ हजार ८६ निगेटिव्ह तर १७ जण पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई व शिरूर तालुक्यात प्रत्येकी ३, बीड ५, आष्टी २ तसेच धारूर, गेवराई, परळी व पाटोदा या चार तालुक्यातील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे.
Leave a comment