नांदूरघाट । वार्ताहर
केज तालुक्यातील नांदुर घाट जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत असलेले वाघेबाबळगाव ते दरडवाडी चाकरवाडी रस्त्यावर वाघेश्वरी मंदिराजवळ पापनाशी नदीवर पूर आल्यानंतर फूल वाहून गेल्याचे निदर्शनास आले आहे. दोन वर्षांपूर्वी हा पुल करण्यात आला होता. परंतु अत्यंत निकृष्ट काम केल्यामुळे पुलांची दुरावस्था झालेली आहे.
30 लक्ष रुपये बजेट असतानादेखील खूप निकृष्ट काम केल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो असा आरोप देखील ग्रामस्थ व प्रवासी आरोप करत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे देखील अतोनात नुकसान झालेले असताना. दैनंदिन दळणवळणासाठी दहा ते पंधरा गावांना जोडणारा रस्ता त्या रस्त्यावरील पूल वाहून गेल्यामुळे गावकर्यांचे हाल होताना दिसत आहेत. तात्काळ पुलाचे काम करून द्यावे अशी मागणी संबंधित विभागाला ग्रामस्थांनी व प्रवाशांनी केली आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे जनतेचे होणारे हाल लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी तात्काळ पुलाचे काम करून द्यावे अशी मागणी होताना दिसत आहे.
याबाबत राजेभाऊ हांडगे म्हणाले, अतिवृष्टीच्या पावसामुळे नदीला भरपूर पाणी आल्यानंतर दोन वर्षांपूर्वी 30 लक्ष रुपयाचा पूल कित्येक वर्षाच्या वनवासानंतर शासनाने पुल करून दिला परंतु गुत्तेदार यांनी घात केला. लवकरात लवकर पुलाचे काम करून द्यावे व संबंधित गुत्तेदारआला शासनाने धडा शिकवावा.
Leave a comment