गेवराई । वार्ताहर
तलवाडा ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपीने पोलीसाच्या हाताला झटका देवून हातकडीसह धूम ठोकली. गेवराई न्यायालयात 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या आरोपीला पकडण्याचे आवाहन पोलीसांसमोर आले.
पोलीसांच्या माहितीनुसार तुकाराम कचरुबा आव्हाड (रा.नित्रुड ता.माजलगाव) असे हतकडीसह पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध तलवाडा ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यास तलवाडा पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यास गुरुवारी गेवराई न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आणले होते. मात्र तुकाराम आव्हाडने लघूशंका करून येतो असे सांगुन पोलीस हवालदार नारायण काकडे यांच्या हाताला हिसका देवून न्यायालय आवारातून पळ काढला. याप्रकरणी काकडे यांच्या फिर्यादीवरुन गेवराई ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment