मुंबई । वार्ताहर
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग होऊ नये या भीतीनं बंद असलेल्या शाळा आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. आता पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. अखेर राज्यातील शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
गणेशोत्सवानंतर अद्याप तरी रुग्णसंख्या फारशी वाढलेली नाही. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. राज्यात ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा करण्यात येणार आहे. इयत्ता ५ वीपासूनचे पुढील वर्ग सुरु करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व निर्णय राहतील, असंही शासनाने स्पष्ट केलं आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ही आनंदाची बाब आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळेच आता शाळा सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
एक महिन्यापासूनच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या. पण काही अडचणी आल्या. पण येत्या ४ तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. आणि मला वाटतं बऱ्याच जिल्ह्यात वातावरण चांगलं आहे. कोरोना संपल्यात जमा आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. क्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर विचार आणि चर्चा करून मान्यता देण्यात आली आहे. अखेर या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शाळा सुरू होणार अशी चर्चा होतीच. मात्र आता शाळा सुरू करण्याबाबत नियमावली कशी असणार आहे याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष असणार आहे. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. तर दुसरीकडे शाळा सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे.
Leave a comment