मुंबई । वार्ताहर

दहावीचा निकाल ( SSC Result 2021)उद्या जाहीर होणार आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागला आहे. उद्या दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.  

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले होते. या मूल्यमापनाच्या आधारे उद्या दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.  बोर्डाच्या  www.mahahsscboard.in  या अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच दहावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.

उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल, असं ट्विट देखील गायकवाड यांनी केलं आहे.

असा तपासा तुमचा निकाल

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.

यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.

निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

 

 

असं होणार मूल्यांकन

यावर्षी राज्य शिक्षण विभागाने निकालाच्या गणितासाठी पर्यायी मूल्यांकन निकष लावले आहेत. महाराष्ट्र वर्ग दहावीच्या मूल्यांकन निकषानुसार, वर्ग 9 ची वार्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यांकन, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्ड मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल मोजला जाईल.

दहावीच्या निकालाचं सूत्र काय?

दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.
ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.
iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

 

दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील

दहावीच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आपला निकाल अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे.

 

दहावीची परीक्षा यावर्षी 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याच दरम्यान राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता ही परीक्षा रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांना इयत्ता नववी आणि दहावीच्या मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. यामध्ये इयत्ता नववी मिळालेले 50 टक्के गुण व दहावीत वर्षभरात  अंतर्गत मूल्यमापनाचे 50 टक्के गुण एकत्र करून हा निकाल तयार करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले होते. त्यानुसार शाळांनी मुख्यध्यापकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करून विषयनिहाय गुण विद्यार्थ्यांना देऊन हा निकाल बोर्डाकडे पाठवला. त्यानंतर बोर्डाकडून या शाळेकडून आलेल्या निकालावर योग्य ते काम करून उद्या हा निकाल जाहीर करण्याचे ठरवले आहे. दहावीच्या निकलाबाबत विद्यार्थी समाधानी नसल्यास त्यांना परिक्षेचा देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यावर्षी दहावीच्या परिक्षेसाठी एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  यामध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आता या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.