देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुंबई | वार्ताहर
दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं, तुम्ही ते भाषण ऐकलं का? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना “पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा ताईंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासे केले आहेत. त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही”, असं म्हणत ‘पंकजा’ या विषयावर फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं.
नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली. परंतु अखेरीस त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्यात भरीस भर म्हणजे पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनाम्याचं सत्र सुरु केलं. यानंतर पंकजा मुंडे यांनी दिल्ली वारी देखील केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची पंकजांनी भेट घेतली. त्यानंतर वरळीत पत्रकार परिषद घेत “माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. आम्ही कुणाला घाबरत नाही. मी कुणाचा निराधार करत नाही,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याची चर्चा होती.
Leave a comment