धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतेय कारण...; पंकजा मुंडे यांचं संपूर्ण भाषण
कोरोना काळात निर्बंध मोडून शेकडोंची गर्दी जमवल्याचा आरोप
पंकजा मुंडे यांनी मुंबईत घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळावा निमित्त 42 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात निर्बंध असतानाही मंगळवारी शेकडो लोकांनी गर्दी केली. यासंदर्भात सभा आयोजित करणाऱ्या 3 आयोजकांसह एकूण 42 जणांच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले. त्यानंतर मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा उठल्या. त्याच चर्चा सुरू असताना पंकजा मुंडेंनी आधी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी मुंबईत कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी सभा घेतली.
या कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि मुंडे समर्थक एकत्रित आले होते. वरळी येथे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. या कार्यक्रमावरून 42 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात कलम 188, 269, 37 (3), 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून संबंधितांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत.
पत्रकारांशी संवाद..!
Leave a comment