मुंबई :

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपला मोठा धक्का बसला. मराठा, ओबीसी आरक्षण आणि एमपीएससीच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अधिवेशाची सुरूवातच वादळी ठरली.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी तालिका विधानसभा भाजपा आमदारांनी वेलमध्ये उतरुन विधानसभा अध्यक्षांच्या माईकला हात लावला. ओबीसी मुद्द्यावर विरोधकांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आला. भाजपच्या १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.

तालिका अध्यक्ष यांच्याबरोबर धक्काबुक्की ,शिवीगाळ प्रकरणी विरोधी पक्षातील आमदारांचे निलंबन केले गेले आहे. गिरीश महाजन, आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, किर्तीकुमार भांगडिया या आमदारांचा समावेश आहे. या आमदारांना पुढील एक वर्षासाठी विधानसभेच्या मुंबई किंवा नागपूरच्या एकाही कामकाज सहभाग घेता येणार नाही, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

 

 

सभागृहात नेमकं काय घडलं?

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले.

भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या समोरी हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाली. यावेळी भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सभागृहाचं वातावरण अधिकच तापलं होतं.

भाजपचे 12 आमदार निलंबित

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना हा गदारोळ उडाल्याचं सांगितलं जात आहे. राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, कीर्तिकुमार बगाडिया या आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन झालं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.

ओबीसी आरक्षणावरून राडा

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी इम्पेरिकल डेटा केंद्राकडून मिळावा असा ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो, मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही, असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला. यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. परंतु तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितल्यानं भाजपचे आमदार आक्रमक झाले. भाजपच्या आमदारांनी अध्यक्षांच्या समोर वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.