नेकनूर पोलिसांनी लावला 24तासात छडा
नेकनूर । वार्ताहर
मांजरसुंबा घाटात मंगळवारी सकाळी बुलेटवर एका तरुणाचा अपघात दिसून आला मात्र हा अपघात नसून खुनाचा प्रकार असल्याचे एपीआय लक्ष्मण केंद्रे यांना जाणवल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य आरोपीला मयताच्या दाजीला काही तासात बेड्या ठोकत इतर दोन आरोपींना आज सकाळी ताब्यात घेतले.
निलेश शहादेवद ढास वय 25 रा. लिंबागणेश असे मयत तरुणाचे नाव असून सोमवारी दवाखान्यात मामाला भेटण्यासाठी गेलेला हा युवक मंगळवारी सकाळी घाटात मयत अवस्थेत आढळला बुलेट चा अपघात झाल्याचे भासविण्यात आले मात्र घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार खुनाचा असल्याचे नेकनूर पोलिस स्टेशनचे एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी ओळखले तातडीने तपासाला गती देत यातील मुख्य आरोपी तथा मयत युवकाचा दाजी तथा मामाचा मुलगा मनोज अंकुश घोडके वय30 याला पोलिसांनी अंत्यविधी होताच ताब्यात घेतले त्यानंतर बुधवारी सकाळी यातील उर्वरित आरोपी राजाभाऊ ज्ञानदेव यादव वय21 राहणार वांगी कृष्णा गोपीनाथ डाके वय 27 राहणार काठोडा यांना अटक केली एपीआय लक्ष्मण केंद्रे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल शरद कदम ,खाडे, राख ,प्रशांत शिरसागर, डीडोळ ,सानप, नवले यांनी 24 तासात याची उकल केली यापूर्वीही एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी तीन खुनाचे गुन्हे काही तासात उघडकीस आणत आरोपी जेरबंद केले आहेत
Leave a comment