मुळुकसमर्थक शहरप्रमुख सोळंके यांना जबर
मारहाण;आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
माजलगाव । वार्ताहर
दोन दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून सचिन मुळुक यांना हटवून माजलगावचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांना जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त केल्यानंतर शिवसेनेत उघड उघड सुरू झालेली धुसफूस गुरुवारी (दि.24) रस्त्यावर बेदम मारहाण करण्यापर्यत पोहचली.नूतन जिल्हा प्रमुख समर्थक 7 ते 8 कार्यकर्त्यांनी 15 वर्षांपासूनच्या निष्ठावन्त जुन्या शिवसैनिक असणार्या माजी नगरसेवक व सध्या शहर प्रमुख असणार्या धनंजय उर्फ पापा सोळंके यांना चाबूक,बेल्ट लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात जिल्हा प्रमुख जाधव यांच्या लहान बंधूंचा समावेश आहे.
शिवसेने मधील नवनियुक्त शिवसेना जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या मिरावणुकी दरम्यान शहराध्यक्ष धनंजय (पापा)सोलके यांनी निवडीला विरोध करत नुतन जिल्हा प्रमुख जाधव यांच्या निघालेल्या मिरवणुकीवर वंगण फेकण्याचा प्रयत्न केला तेव्हा आप्पासाहेब जाधव समर्थकांनी शहराध्यक्ष पापा सोळंके यांना जबर मारहाण केली.याप्रकरणी धनंजय सोळंके यांनी आठ जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुख पदावरून झालेल्या राड्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी पुन्हा एकदा समोर आली आहे.
माजलगाव शिवसेनेचे तत्कालीन तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांना बढती देऊन त्यांची शिवसेना बीड जिल्हा प्रमुख म्हणून दोन दिवसापूर्वी निवड केली होती. यावरून माजलगाव मध्ये दुसर्या गटाकडून नाराजी व्यक्त करत निष्ठावान शिवसैनिकांना डावलून पक्षात नवीन आलेल्याना जिल्हाप्रमुख करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दोन दिवसापूर्वी शहराध्यक्ष धनंजय सोळंके यांनी शिवाजी चौकात अप्पासाहेब जाधवच्या निवडीचा निषेध करत घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला चप्पलने मारहाण केली होती. गुरुवारी सकाळी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव हे माजलगाव मध्ये आले असता त्यांचीकेसापुरी कॅम्प पासून मिरवणूक काढण्यात आली. संभाजी चौकात मिरवणूक आली असता शहराध्यक्ष धनंजय सोळंके व त्यांच्या समर्थकांनी नुतून जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यावर वंगन फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतप्त जाधव समर्थकांनी पापा सोळंके यांना बेल्ट व वायरने बेदम मारहाण केली. यामध्ये सोळंके यांना गंभीर मार लागला आहे. याप्रकरणी धनंजय सोळंके यांनी मुंजा कडाजी जाधव, माऊली गायके, महादेव वैराळे, सुखदेव धुमाळ, सुरेश पाष्टे यांच्यासह तीन अनोळखी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
Leave a comment