ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात आता बुधवारपासून 18 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस दिली जाणार आहे. असे असले तरी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. आरोग्य विभाग लसीकरणासाठी सज्ज असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी सांगितले.
जिल्ह्यात सुरूवातीला केवळ 45 वर्षांवरील प्रत्येकला लस दिली जात होती. नंतर मागील चार दिवसांपासून 30 वर्षांवरील प्रत्येकाला लस देणे सुरू केले. आता बुधवारपासून 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस दिली जाणार आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयात लसीकरण केंद्र तयार केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी सांगितले. तसेच इझी व निडली पद्वारे ऑनलाईन नोंदणी करून टोकन क्रमांकानुसार प्रत्येकाला बोलावले जाईल. गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करूनच लस घ्यावी, असे आवाहनही डॉ.पवार यांनी केले आहे.
Leave a comment