मागील वर्षीच्या शैक्षणिक फीस मध्ये नव्वद

टक्के सवलत ; पालक वर्गातून स्वागत

 

 

बीड । वार्ताहर

 

कोरोनामुळे  रोजगार व नौकऱ्या गमावलेल्या इंग्रजी शाळा पालकांनी मागील  शैक्षणिक वर्षातील फीस भरण्यास असमर्थता दर्शवली आहे.   शाळांनी पन्नास टक्के फीस सवलत द्यावी यासाठी शाळा  प्रशासनाला विनंती केली जात आहे ; पण शाळा संचालक दहा टक्के सवलत देण्यावर ठाम असतांना दुसरीकडे मात्र मांजरसुंबा येथील शिखर पब्लिक स्कूलने पालकांना दिलासा देत मागील वर्षीच्या फीस मध्ये नव्वद टक्के सवलत देत चालू वर्षीचा प्रवेशही कुठल्या जाचक अटीविना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पालक वर्गातून स्वागत होत आहे. इतर शाळांनी हा  आदर्श घेत फीस सवलत द्यावी अशी मागणी होत आहे.

    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी  सततचे लॉकडावून आणि सरकारच्या नव्या-नव्या  नियमामुळे सामन्य, मजूर, शेतकरी वर्ग पूर्णतः  कोलमडला गेला;  अशातच शाळां ही बंद ठेवाव्या लागल्या मात्र  शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग शोधल्यामुळे मुलांचे शिक्षणाचे सातत्य काही प्रमाणात टिकून राहिले. तर दुसरीकडे लॉकडावून मुळे अनेक पालकांचे   

रोजगार बंद पडले, नौकऱ्या गेल्या त्यामुळे अनेकांची अर्थिक परिस्थीती बिकट होत गेली. ऑनलाईन शिक्षण असले तरी शाळांनी पूर्ण फीस भरण्याचा तगादा पालकांकडे लावला; काही शाळांनी फीस न भरणाऱ्या विद्यार्थ्याचे  ऑनलाईन शिक्षण बंद केले. राज्य सरकार व शिक्षण मंत्रालयाकडून फीस बाबत दररोज नव नवीन आदेश शाळांना दिले जात  होते पण कुठलाही  ठोस निर्णय झाला नाही. सुप्रिम कोर्टाने शाळाच्या बाजूने सकारात्मक निर्णय दिल्यामुळे फीसचा पेच पालकांसमोर उभा राहिला आहे. 2021-22 हे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन हप्ता झाला आहे. गत वर्षीच्या फीस मध्ये पन्नास टक्के सवलत मिळावी म्हणून पालक आग्रही आहेत. तर शाळा मात्र दहा टक्के सवलत देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. अजूनही अनेक इंग्रजी शाळांमध्ये फीस अभावी पूर्ण क्षमतेने ऑनलाईन वर्ग सुरू झाले नाहीत. शेतकरी, कामगार, सामान्य पालकांच्या हातात रोजगार नसल्याने फीस कोठून भरावी हा  प्रश्न असतांना बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील शिखर पब्लिक स्कूलच्या संचालक मंडळाने कोरोना परिस्थितीमुळे हतबल झालेल्या पालकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. सन 2020-21 च्या शैक्षणिक शुल्कात 90 % एवढी भरीव सूट देत चालू शैक्षणिक वर्षात फक्त एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करावे व प्रवेश निश्चित करावा असा  महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पालक वर्गात आनंद व्यक्त केला जात असून पालकांच्या बाजुने निर्णय घेणारी शिखर पब्लिक स्कूल जिल्ह्यातील नव्हे राज्यातील एकमेव शाळा ठरली आहे. इतर इंग्रजी शाळांनाही असा आदर्श निर्णय घ्यावा अशी पालकांतुन मागणी होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.