वडवणी । वार्ताहर
वडवणी तालुक्यातील कुप्पा गावातील रहिवासी असलेल्या हरिभाऊ लक्ष्मण वडचकर वय अंदाजे 65 वर्ष यांच्या शरीरावर कुठल्याही धातुच्या वस्तू चिकटत असल्याचे समोर आल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
नाशिक नंतर बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील कुप्पा गावातील हरिभाऊ लक्ष्मण वडचकर यांनी मंगळवार 8 जुन रोजी कोव्हिसिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता..नाशिक कडील बातमी पाहून श्री वडचकर यांनी देखील आपण हे करुन पाहु म्हणत अंगाला स्टिल च्या वस्तू चिकटावुन पाहील्या तर आश्चर्य त्यांच्या अंगाला ही या स्टिल च्या वस्तू चिकटत असल्याचे समोर आले आहे..याबाबत कुप्पा येथील रहिवासी असणारे जिल्हा परिषद सदस्य औदुंबर सावंत यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना तातडीने माहिती देऊन तपासणी करण्याचे सांगितले आहे. वडचकर आणि जिल्हा परिषद सदस्य श्री.सावंत यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
Leave a comment