बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होवू लागली आहे. आज शुक्रवारी (दि.11) नवे 130 रुग्ण निष्पन्न झाले. निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर रुग्णसंख्या वाढते की, काय अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र रुग्ण संख्येचा आलेख आता उतरला आहे.
गुरुवारी जिल्ह्यातील 2 हजार 866 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाले. यात 130 पॉझिटिव्ह तर 2 हजार 736 अहवाल निगेटिव्ह आलेे. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 15, आष्टी 9, बीड 28, धारुर 7, गेवराई 4, केज 23, माजलगाव 13, परळी 4, पाटोदा 5, शिरुर 16 व वडवणी तालुक्यातील 6 रुग्णांचा समावेश आहे.
Leave a comment