पुणे। वार्ताहर

 

 राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना 20 बसेस देण्यात येणार आहेत. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पालखी सोहळ्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या पालख्यांसाठी २० बस देण्यात येणार आहेत. तसेच पालखी सोबत असणाऱ्या प्रत्येकाही वैद्यकीय तपासणी देखील करण्यात येणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

यंदा पालखीच्या प्रस्ठानासाठी देऊ आणि अळंदीमध्ये 100 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. उरलेल्या 8 पालख्यांना प्रत्येकी 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

प्रत्येकी 2 बसमधून यंदाही मनाच्या पालख्यांना रवाना होणार आहेत. मानाच्या पालख्यांना वाखरीमध्ये पोहोचल्यावर दीड किलोमीटर प्रातिनिधीक पायी वारी करायला परवानगी देण्यात आली आहे. तसंच शासकीय महापूजा गेल्या वर्षीप्रमाणे होणार आहे. रिंगण आणि रथोत्सवासाठी केवळ १५ वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची एक बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. त्यानंतर काल राज्याची कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे  पवार म्हणाले.

 

 

कसा असणार पायी वारी सोहळा

 

- पालखी यंदाही बस मधूनच पंढरपूरकडे जाणार

- लवकरच शासन त्याबद्दल सविस्तर आदेश काढणार आहे

- इतर वारकरी दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी बंधनकारक

- काला आणि रिंगण सोहळ्याला परवानगी दिली

- रथोत्सवला ही परवानगी, त्यासाठी १५ वारकऱ्यांना परवानगी

- प्रत्येक पालखीसोबत 40 वारकऱ्यांना परवानगी

- प्रस्थान सोहळ्याला 100 वारकऱ्यांची उपस्थिती

दहा मानाच्या पालख्या 

०१) संत निवृत्ती महाराज ( त्रंबकेश्वर )

०२) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )

०३) संत सोपान काका महाराज ( सासवड )

०४) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )

०५) संत तुकाराम महाराज ( देहू )

०६) संत नामदेव महाराज ( पंढरपूर )

०७) संत एकनाथ महाराज ( पैठण )

०८) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )

०९) संत निळोबाराय ( पिंपळनेर - पारनेर अहमदनगर )

१०) संत चांगटेश्वर महाराज ( सासवड )

मानाच्या पालखी सोहळ्याचं आगमन हे दशमीला पंढरपूरात होईल. वाखरीत विशेष वाहनाने पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरपर्यंत पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पंढरपूरचे मंदिर दर्शन खुले करण्यात येणार नाही असं अजित पवार यांनी सांगितलं.

 

 

10 पालख्यांना 20 बसेस देणार

या दहाही मानांच्या पालख्यांना वारीला जाण्यासाठी 20 बसेस दिल्या जाणार आहेत. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांना बंधनकारक आहे. तर देहू-आळंदी पालखीबरोबर 100 जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली. या सर्व पालख्यांना कोरोनाचे नियम पालन करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

पायी जाण्यास मज्जाव, रिंगण-रथोत्सावाला अटींवर परवानगी

वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास देण्यात आली नाही, असं ते म्हणाले.

भाविकांसाठी मंदिर बंद

दरम्यान, भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, असं सांगतानाच इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.