बीड । वार्ताहर
०५ जून जागतिक पर्यावरण दिन च्या निमिताने रोटरी क्लब ऑफ बीड व सामाजिक वनीकरण विभाग बीड यांच्या संयुक्त विद्यमाने २०२१ वृक्षारोपण शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण Social Distancing चे नियम पाळून हा सुंदर कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास श्री.प्रविण धरमकर ( उपजिल्हाधिकारी बीड), श्री.अमोल सातपुते ( विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण,बीड ), श्री.एन. व्ही.पाखरे(सहाय्यक वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण बीड) ,श्री. प्रदिप चितलांगे ( माहेश्वरी सभा बीड जिल्हाध्यक्ष),श्री.रमेश राऊत (सामाजिक वनीकरण विभाग) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दरवर्षी रोटरीच्या वतीने पर्यावरण दिन साजरा केला जातो व वृक्षारोपण केले जाते. या वर्षी देखील सामाजिक वनीकरण बीड यांच्या सहाय्याने सार्थक सिद्धी
गोशाळा ,आनंदवाडी,जालना रोड बीड या ठिकाणी दि.०५ जून २०२१ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व रोटरी सदस्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.जवळपास 300 झाडे लावन्यात आली. प्रास्ताविक करतांना सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री.अमोल सातपुते यांनी पर्यावरनाचे महत्त्व विशद केले व प्रत्येक व्यक्तीने 3 झाडं लावावी असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप करताना बीड चे उपजिल्हाधिकारी श्री.प्रवीण धरमकर साहेबांनी " वृक्ष नेते " तयार व्हायला पाहिजेत ही संकल्पना मांडली तर नुसते झाडे लावून काही होणार नाही तर त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे असे सांगितले व रोटरी ने यात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन क्लब ट्रेनर तथा प्रोजेक्ट चेअरमन रो.अक्षय शेटे यांनी केले तर आभार प्रदर्शन रो.राजेंद्र मुनोत यांनी मांडले. कार्यक्रमानंतर सर्वांनी गोशाळेस भेट दिली.या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ बीड चे अध्यक्ष रो.मुकुंद कदम, सचिव रो.प्रा.सुनील खंडागळे , मा.सौ.ज्योती मुनोत (संचालिका- सार्थक सिद्धी गोशाळा)मा.सौ.उमा औटे (संचालिका- सार्थक सिद्धी गोशाळा), रो. अभय कोटेचा, रो.वाय.जनार्दन राव, रो.सूरज लाहोटी, रो.विलास बडगे, रो.विकास उमापूरकर,आनंदवाडी चे सरपंच देवकते नाना, श्री.विष्णू देवकते,भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशिष जैन, अमित पगारिया ,आदेश नहार ,सचिन कांकरीया रोशन ललवाणी, निलेश ललवाणी धनंजय ओस्तवाल ,सुनील औटी व गुड मॉर्निंग चे सदस्य, राजस्थानी सेवा समाज चे अध्यक्ष ऍड.ओमप्रकाश जाजू व सचिव रामेश्वरजी कासट,प्रमोद मणियार ॲडव्होकेट विजय कासट तसेच सामाजिक वनीकरण विभागाचा स्टाफ, रेशीम कोष विभागाचे अधिकारी व आनंदवाडी मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a comment