जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचा इशारा

बीड । वार्ताहर

जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने 1 जून पासून लॉकडाऊन मधील अनेक कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, जिल्ह्यातील नागरिक पुन्हा बेफिकिरीने वागत असून नियम पाळत नसल्याचे आढळून आले आहे. परिणामी रुग्णसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड विषयक नियमांचे पालन न केल्यास पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याचा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले की,लॉकडाऊन शिथील केल्यानंतर विनाकारण लोक रस्त्यावर व शासकीय कार्यालयात दिसून येतात ही गंभीर बाब आहे. सद्यस्थितीत कोविड रुग्णसंख्या जरी कमी असली तरी गर्दी केल्यास अथवा कोव्हीडचे अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास पुन्हा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते किंवा कडक लॉकडाऊन लागू केला जाईल. बेशिस्त नागरीकांच्या वागणुकीचा परिणाम सर्व समाजास त्रासदायक होऊ शकतो. सर्व लोकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे व कोव्हीडचे नियम पाळुन दिनांक 15 जून पर्यंत शासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.
तसेच, एकाचवेळी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये व सामाजिक अंतर ठेवणे तसेच मास्क घालणे, जास्त गर्दीमध्ये जाणे टाळणे इत्यादी बाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणेत यावे. यापुढे कोविड विषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर नियमानुसार गुन्हा नोंद करण्यात येईल. व्यापार्‍यांनी दुसर्‍या व्यावसाययिकांकडे लक्ष वेधण्याऐवजी आपण स्वतः सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन विनापरवानगी दुकाने उघडू नयेत व उघडल्यास याची गंभीर दखल घेण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी जगताप यांनी दिला आहे. कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हयातील नागरीकांनी प्रत्येक ठिकाणी सामाजिक अंतर ठेवावे व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.