समस्या दूर करून सुसज्जता आणावी-आ. सुरेश धस
आष्टी । वार्ताहर
बीड जिल्ह्याची विकासवाहिनी ठरणारा अहमदनगर - बीड - परळी रेल्वेमार्ग कडा शहाराजवळून जात आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या बीडसह अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, करमाळा, पाथर्डी व नगर अशा 6 तालुक्यांमधील मुख्य बाजारपेठ म्हणून कडा शहर पुढे येत आहे.
येथे कांदा, अन्नधान्य व इतर बाबींचा व्यापार कोट्यवधींचे आकडे पार करत असून मोठी बाजारपेठ असल्याने रेल्वे स्टेशन मोठ्या जागेत होणार आहे. भविष्यात नामांकित स्टेशन म्हणून ओळखले जावे त्यामुळे स्टेशन परिसरात वृक्षारोपण, गार्डन ,सुसज्ज रस्ते इत्यादी गोष्टींचा आढावा घेऊन काही ठिकाणी समस्या आहेत त्या दूर करण्याचे आदेश आ सुरेश अण्णा धस यांनी दिले.कडा शहर रेल्वे स्टेशन तसेच भिगवण सह राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्गांनी जोडले गेलेले आहे व जोडले जात आहे. जिल्हा, राज्यासह रेल्वेमुळे येथील बाजारपेठ देशाच्या नकाशावर झळकणार असून त्याप्रमाणे रेल्वे स्थानक तसेच शहराची आवश्यक त्या पायाभूत विकासाची तयारी असायला हवी, यासाठी आ सुरेश अण्णा धस यांनी यावेळी रेल्वे व महसूल अधिकार्यांना सूचना केल्या. आ सुरेश अण्णा धस यांनी यावेळी रेल्वे स्थानक, विविध रस्ते, रेल्वे मार्ग आदी कामांची पाहणी देखील ऑन द स्पॉट जाऊन केली. यावेळी रेल्वेचे अधिकारी श्रीवास्तव सर, रेल्वे इंजि. सिंग साहेब,बी.डी.ओ. मुंडे, सभापती बद्री जगताप, सरपंच अनिल ढोबळे, संजू ढोबळे, तळेकर अप्पा, ग्रामसेवक खिल्लारे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment